नाशिक रिजनची गगनभरारी – नाशिक पुण्यभूमीमध्ये तपोवन चाप्टरचे लॉन्चिंग
September 10, 2024
दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजी नाशिक रिजन मधील पाचवा आणि नाशिक नगर रीजन मधील आठवा चाप्टर सॅटर्डे क्लबचे मॅनेजिंग ट्रस्टी आणि चेअरमन सन्माननीय श्री. अशोकजी दुगाडे, सेक्रेटरी जनरल सन्माननीय श्री. सुहासजी फडणीस, डेप्युटी सेक्रेटरी जनरल सन्माननीय श्री. सुभाषजी गोरे आणि माझ्या उपस्थितीमध्ये लॉन्च करण्यात आला.
या नवीन चाप्टरसाठी नाशिक रीजनच्या रीजन हेड सौ. अश्विनी कुलकर्णी मॅडम, डेप्युटी रिजन हेड श्री. योगेश सोनजे सर आणि डॉ. प्रवीण केंगे सर यांनी अथक परिश्रम घेतले. यांच्यासोबत नवीन “तपोवन” चाप्टरचे पालकत्व घेतलेले नाशिक पंचवटी चाप्टरचे चेअरपर्सन श्री. अक्षय वडनेरे सर, सेक्रेटरी डॉ. वैभव वाणी सर आणि ट्रेझरर श्री. अमर रंधे सर यांनी एकेक मेंबरसाठी प्लॅनिंग करत आणि प्रत्येकाला भेटत या चाप्टरमध्ये नवीन मेंबर जोडून घेतले.
या चाप्टरची धुरा नवनिर्वाचित टीम कडे सोपवण्यात आली. नवीन चाप्टरचे चेअरपर्सन म्हणून श्री. अक्षय बेळे, सेक्रेटरी म्हणून श्री. मयूर शिरोरे आणि ट्रेझरर म्हणून श्री. विवेक एरंडे यांनी पदभार स्वीकारला.
रिजन लीडरशिप, नाशिक पंचवटी चाप्टर आणि नवनिर्वाचित तपोवन चाप्टरचे सीएसटी यांच्या अथक परिश्रमातून “नाशिक तपोवन” चाप्टरचा लॉन्चिंग सोहळा अतिशय उत्साहात नाशिक येथे पार पडला. यात आपण मला आमंत्रित करून माझा जो सन्मान केला, त्यासाठी मी आपणा सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.
या नवीन चाप्टर लॉन्चिंगसाठी रिजन लीडरशिप, नाशिक पंचवटी चाप्टर चे सीएसटी आणि नवनिर्वाचित तपोवन सीएसटींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.