- Home
- FAQ’s
Frequently Asked Questions
Saturday Club Global Trust (SCGT) म्हणजे काय?
Saturday Club Global Trust (SCGT) हे मराठी उद्योजकांना एकमेकांशी जोडून नेटवर्किंग आणि व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन करणारे एक प्रमुख व्यासपीठ आहे. ही एक नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था (Registered Non-Profit Trust/NGO) असून, याची स्थापना इंजि. माधवराव भिडे यांनी २००० साली केली. मराठी माणसाने नोकरी सोडून व्यवसाय करावा आणि श्रीमंत व्हावे, आणि अश्या श्रीमंत उद्योजकांचा मराठी समाज घडवावा, हा मुख्य उद्देश असून “एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत ।” या तत्वावर संस्थेचे सर्व कामकाज चालते.
SCGT ची व्याप्ती किती मोठी आहे?
SCGT चे जाळे संपूर्ण भारतभर तसेच परदेशात मिळून २०० पेक्षा जास्त चॅप्टर्स (Chapters) मध्ये पसरलेले आहे. या चॅप्टर्सच्या माध्यमातून संस्थेला ८००० पेक्षा जास्त मराठी उद्योजक जोडलेले आहेत. यामुळे सदस्यांना स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात.
SCGT मध्ये कोण सहभागी होऊ शकते?
सर्व क्षेत्रांतील मराठी व्यावसायिक, उद्योजक, सेवा पुरवठादार (Service Providers), सल्लागार (Consultants), स्टार्टअप फाउंडर्स, प्रोफेशनल्स, आणि जागतिक पातळीवरील कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी SCGT च्या नियमांनुसार सदस्य होऊ शकतात.
SCGT फक्त नवीन आणि छोट्या उद्योजकांसाठीच आहे का?
नाही, नवीन आणि छोट्या उद्योजकांसोबतच SCGT मध्ये २.५ ते ५ कोटी टर्नओव्हर असलेले Rising Elite, १० ते २० कोटी टर्नओव्हर असलेले Elite आणि ५०० कोटींपेक्षा जास्त व्यवसाय असलेले Super Elite Group असून, प्रत्येक सदस्याला त्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो
SCGT मध्ये सहभागी होण्याचा मुख्य उद्देश काय आहे?
एकमेकांशी विश्वासाचे व्यावसायिक संबंध निर्माण करणे, ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि नेटवर्किंगच्या माध्यमातून व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. “एकमेकां साह्य करू, अवघे होऊ श्रीमंत ।” या तत्वावर सर्व मेंबर्स इथे एकमेकांना सहकार्य करतात आणि एकमेकांचे व्यवसाय वाढविण्यासाठी एकत्र येतात.
SCGT चे सदस्यत्व घेतल्यावर आपल्या व्यवसायाला काय फायदे होतात?
– ग्लोबल नेटवर्किंग: भारत आणि परदेशातील २००+ चॅप्टर्समधील ८०००+ मराठी उद्योजकांशी थेट संपर्क.
– बिजनेस रेफरल्स (Referrals): इतर सदस्यांच्या माध्यमातून नवीन ग्राहक, सल्लागार, व्हेंडर्स, बिझनेस मेंटॉर आणि व्यवसायाच्या अनेक संधी.
– सहकार्य (Collaboration): इतर उद्योजकांसोबत भागीदारी किंवा सहकार्याने मोठे प्रकल्प उभारण्याची संधी.
– ज्ञानवृद्धी (Knowledge Sharing): विविध कार्यशाळा आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून व्यवसाय वाढवण्याचे कौशल्य.
SCGT चे कामकाज आणि नेटवर्किंग कसे चालते?
सदस्यांमध्ये सातत्याने संवाद राहावा यासाठी दर १५ दिवसांनी नियमित मिटींग्स आणि नेटवर्किंग उपक्रम आयोजित केले जातात. या बैठकांमध्ये सदस्य आपापला व्यवसाय सादर करतात आणि परस्पर सहकार्याच्या संधी शोधतात.
Saturday Club Global Trust मध्ये सदस्य म्हणून कसे सहभागी होता येईल?
Saturday Club Global Trust मध्ये सदस्य म्हणून सहभागी होण्यासाठी आमच्या वेबसाईटवरील ‘Contact Us’ फॉर्ममध्ये आपली माहिती नोंदवा. आपली माहिती मिळाल्यानंतर आमचे विभाग प्रतिनिधी तुमच्याशी संपर्क साधतील. संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेतल्यानंतर नियमांनुसार तुम्ही SCGT चे अधिकृत सदस्य होऊ शकता.
SCGT च्या बैठकांमध्ये (Meetings) नेमके काय घडते?
या बैठकांमध्ये सदस्य आपापल्या व्यवसायाची माहिती देतात, नवीन उत्पादने किंवा सेवांचे सादरीकरण (Business Presentations) करतात, एकमेकांना व्यावसायिक संदर्भ (Referrals) देतात आणि उद्योगातील नवीन संधींवर चर्चा करतात.
नवीन किंवा नवउद्योजकांसाठी (Startups) SCGT उपयुक्त आहे का?
होय, नवउद्योजकांसाठी SCGT अत्यंत उपयुक्त आहे. येथे अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन (Mentorship), संभाव्य ग्राहक, भागीदार, व्हेंडर्स आणि व्यवसायाला लागणारे योग्य नेटवर्किंग सुरुवातीच्या काळातच सहज उपलब्ध होते.
इतर बिजनेस नेटवर्किंग संस्थांपेक्षा SCGT चे वेगळेपण काय आहे?
SCGT ही मराठी उद्योजकांसाठी काम करणारी ना-नफा (Not-for-Profit) संस्था आहे. केवळ व्यावसायिक व्यवहार वाढवणे हाच उद्देश नसून, मराठी उद्योजकांमध्ये परस्पर विश्वास, सहकार्य आणि कौटुंबिक नाते निर्माण करणे हे SCGT चे मुख्य वैशिष्ट्य आहे. येथे एकमेकांना व्यवसाय वाढविण्यासाठी मदत केली जाते; मात्र कोणत्याही व्यवसायाच्या संदर्भात कोणतेही कमिशन दिले जात नाही.
SCGT मध्ये महिला उद्योजकांसाठी (Women Entrepreneurs) विशेष संधी आहेत का?
होय, SCGT मध्ये महिला उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, नेटवर्किंग वाढवण्यासाठी आणि नेतृत्व कौशल्ये विकसित करण्यासाठी पूर्ण प्रोत्साहन व स्वतंत्र व्यासपीठ दिले जाते.
परदेशात व्यवसाय वाढवू इच्छिणाऱ्या सदस्यांसाठी SCGT मध्ये काय संधी आहेत?
SCGT च्या जगभरातील विविध देशांमध्ये असलेल्या चॅप्टर्स आणि आंतरराष्ट्रीय नेटवर्कमुळे सदस्यांना परदेशी बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे होते. जर एखाद्या सदस्याला परदेशात आयात-निर्यात (Import-Export), नवीन ग्राहक शोधणे किंवा आंतरराष्ट्रीय भागीदार मिळवायचे असतील, तर संस्था तेथील स्थानिक मराठी उद्योजकांशी थेट नेटवर्किंग, मार्गदर्शन आणि व्यावसायिक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. तसेच गर्जे मराठी, World Trade Centre या व अशा अनेक संस्थांसोबत SCGT चे सामंजस्य करार (MOU) झालेले असल्यामुळे, त्या संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध संधी आणि सुविधांचे फायदे देखील SCGT च्या सदस्यांना मिळतात.
SCGT च्या राष्ट्रीय स्तरावरील (Pan-India) नेटवर्कचा सदस्यांना कसा फायदा होतो?
महाराष्ट्राबाहेर भारतातील इतर प्रमुख राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये असलेल्या SCGT च्या चॅप्टर्समुळे सदस्यांना संपूर्ण देशभरात व्यवसाय विस्तारण्याची संधी मिळते. जर एखाद्या सदस्याला दुसऱ्या राज्यात नवीन ग्राहक मिळवायचे असतील, पुरवठादार (Suppliers) शोधायचे असतील किंवा आंतर-राज्य व्यवसाय (Inter-state Business) करायचा असेल, तर SCGT चे राष्ट्रीय नेटवर्क स्थानिक पातळीवर थेट संपर्क, व्यावसायिक मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करते. तसेच केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांसोबतही SCGT चे सामंजस्य करार (MOU) असून, त्याचा सदस्यांना शासकीय योजना, संधी आणि व्यवसायविषयक मार्गदर्शन मिळविण्यासाठी फायदा होऊ शकतो.
SCGT च्या 'Cross-Chapter' भेटींचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा उपयोग होतो?
SCGT च्या नियमांनुसार, एक सदस्य इतर कोणत्याही चॅप्टरच्या बैठकीत (Cross-Chapter Meetings) उपस्थित राहू शकतो आणि आपले सादरीकरण (Presentations) करू शकतो. यामुळे सदस्यांना स्वतःच्या शहरापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेकडो उद्योजकांसमोर आपल्या उत्पादनांचे व सेवांचे प्रदर्शन करण्याची आणि नवीन बाजारपेठ मिळवण्याची थेट संधी मिळते.