चहू दिशांना उधळु दे, उद्यमांचे वारू , सॅटर्डे क्लबच्या साथीनं, स्वप्नांना साकारू
मॅक्सज्ञान स्पोर्ट्स आणि प्रज्ञा वर्धिनी फाऊंडेशन तर्फे शनिवार, ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी बोरिवली पश्चिम येथील सुविद्या स्पोर्ट्स अकादमी येथे किड्स स्पोर्ट्स कार्निव्हल २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या दिमाखदार क्रीडा महोत्सवात १५ शाळां मधून ८५० विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेतला होता.
या मेगा इव्हेंटसाठी आम्ही आपल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट च्या उद्योजक मित्र मैत्रिणींना व्यावसायिक दृष्ट्या सहभागी करून, एकूण रु. ७५,०००/- चा व्यवसाय देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.
त्यात प्रामुख्याने केटरिंगसाठी कल्पित वैद्य बोरिवली चॅप्टर, स्नॅक्स बॉक्सेससाठी धनश्री सुकी गोरेगाव चॅप्टर, प्रिंटिंगसाठी अनिल आंब्रे मिरा भाईंदर चॅप्टर, फोटो – व्हिडिओसाठी वंदन वायंगवडेकर दहिसर चॅप्टर, प्रोजेक्टर स्क्रीनसाठी लक्ष्मीकांत जाधव मिरा भाईंदर चॅप्टर, हेल्दी न्यूट्री बारचा स्टॉल लीना ठाकूर दादर चॅप्टर, हेअल्थ अँड नुट्रीशन साठी फीसीओथेरपीस्ट डॉ.मधुरा जामसांडेकर दहिसर चॅप्टर, सिक्युरिटी सर्विसेससाठी शैलेश महाडिक ऐरोली चॅप्टर आदी उद्योजकांचे आम्हाला सहकार्य लाभले.
हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी आमच्या सर्व प्रायोजकांचे आणि शुभचिंतकांचे आभार
प्रायोजक – श्री विल्फ्रेड मेनेझेस, संस्थापक अथेना ग्लोबल लॉजिस्टिक – मीरा भाईंदर चॅप्टर, श्री राजेश गाडगीळ – जाई काजळ, श्री. प्रदीप गद्रे – Effervescent SciTech – मुंबई एलिट चॅप्टर, श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, श्री मोहन रानडे, सौ. सिद्धी पाडगावकर, बोरिवली चॅप्टर
उत्तर मुंबई मतदारसंघाचे माजी खासदार गोपाळजी शेट्टी आणि वीरमाता अनुराधाताई गोरे यांनी यावेळी १५ शाळांमधील ह्या क्रीडा महोत्सव मध्ये सहभागी झालेल्या ८५० पालक आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी शिस्त, वचनबद्धता आणि संयम विकसित करण्यासाठी खेळाचे महत्त्व पटवून दिले, ज्यामुळे विद्यार्थांना खेळ आणि त्याची मूल्ये आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली. गोपाळ शेट्टी यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन करत मुंबई उपनगराला नजीकच्या भविष्यात स्पोर्ट्स हब बनवण्याचा आपला संकल्प जाहीर केला.
आमच्या ह्या उपक्रमाला उत्तेजन देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे मनःपूर्वक आभार
सूविद्या प्रसारक संघाचे संस्थापक श्री. महादेव गोविंद रानडे, सुविद्या प्रसारक संघाचे माजी अध्यक्ष डॉ. वसंत खटाव, अथेना ग्लोबल लॉजिस्टिक्सचे श्री. विल्फ्रेड मेनेझेस, एमसीए क्रिकेट प्रशिक्षक श्री. नागेश ठाकूर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी सेक्रेटरी जेनरल श्री. नरेंद्र बगाडे आणि नॅशनल बीझिनेस सेल हेड श्री मनीष सरवणकर
||एक मेका साह्य करू अवघे होऊ श्रीमंत||
आमच्या ह्या क्रीडा महोत्सवाचे स्वप्न खऱ्या अर्थाने सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट च्या साथीनं साकारले त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद …
वैशाली भिडे बर्वे आणि ऍड. रूपाली ठाकूर
मॅक्सज्ञान ऍडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड
9820382117 / 9820383118
Email- maxnyanseekers@gmail.com