Saturday Club नगर चॅप्टरची मी पहिली महिला व्यावसायिक.. स्वाधीरशिल्प प्रॉपर्टीज प्रा ली. ची संचालीका …
अहमदनगर मध्ये चॅप्टर सुरु होण्याआधीच Saturday क्लब च्या माध्यमातून नाशिकच्या विजय सानप सरांना भेटायचा योग आला. त्या वेळी त्यांनी रिअल इस्टेट मधील *Solo Selling* बद्दल खोलवर माहिती दिली. आणि नगरमध्ये आपण सुद्धा एखादे प्रोजेक्ट Solo Selling करावे असे ठरवले.
एक संधी आली.. प्रोजेक्ट होता 500 कोटींचा.. आमच्या नगरमधील सर्वात मोठ्या आणि एकमेव मॉल चा .. प्रोजेक्ट च्या owner सोबत सर्व बोलणे झाले.खूप आनंदात होते.. Solo Selling चे अग्रीमेंट करायचे होते. ते अग्रीमेंट सानप सरांना पाठवले. दुसऱ्या दिवशी अग्रीमेंट वर सह्या करायच्या होत्या. खूप मोठे यश मिळत असल्याने खूप खुशीत होते. अग्रीमेंट करायला निघाले आणि रस्त्यात सानप सरांचा फोन आला आणि त्यांनी त्या अग्रीमेंट मधील clauses ची रिस्क समजून सांगितली आणि क्लाजेस काय असायला पाहिजे त्याचे मार्गदर्शन केले. त्यानुसार सदर प्रोजेक्ट owner ला बोलणे केले आणि त्यांनी त्या साठी नकार दिला पहिलाच आलेला 500 करोड रुपयांचा प्रोजेक्ट हातातून गेला याचे दुःख झाले पण त्याच वेळी एका मोठ्या जोखमीतून वाचल्याचे समाधान सुद्धा झाले.. पण खरं सांगायचे तर मनोधैर्य खचले होते.
नगर चॅप्टर सुरु होण्या आधी सध्याचे डेप्युटी सेक्रेटरी जनरल श्री अमोल कासार सर, सागर हासे सर, डॉ सागर गोपाळे सर, अण्णासाहेब थोरात सर, अजित पवार सर, सचिन शिरसाठ सर हे घरी आले होते. त्यांना या सर्व घडामोडीची कल्पना दिली.
त्यावेळी “मॅडम,अशा भरपूर संधी तुम्हाला उपलब्ध होतील, तुम्ही हार मानू नका आणि क्लबच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होईल” असे बोलून पुन्हा एक उभारी दिली
नगर चॅप्टर सुरु झाल्यावर आपण एका Redevelopment प्रोजेक्ट वर काम करण्यास सुरुवात केली. हा नगरमधील पहिलाच *Redevelopment* प्रोजेक्ट असल्यामुळे कायदेशीर अडचणी येत होत्या. त्यावेळी पुन्हा Saturday Club माझ्या मदतीसाठी धावून आला तो *नाशिक च्या ऍडव्होकेट तृप्ती देव मॅडमच्या यांच्या माध्यमातून* नाशिकहून नगरला येऊन सर्व कायदेशीर गोष्टींवर त्यांच्या मार्गदर्शनामुळे या Redevelopment प्रोजेक्ट च्या कायदेशीर बाबी पुर्ण झाल्या. 24 मे 2024 रोजी अग्रीमेंट झाले. आणि पुन्हा एकदा Solo Selling साठी आम्ही सज्ज झालो.
28 पैकी 16 फ्लॅट हे बिल्डरच्या मालकीचे होते आणि ते विकण्याचे अधिकार यावेळी आम्हाला मिळाले. (मागील solo selling च्या क्लाजेस च्या अनुभवाचा इथे फायदा झाला)
सर्वात पहिले नगर चॅप्टर च्या सभासदांना 1 To 1 केले.. त्यांना भेटून या प्रोजेक्ट ची माहिती दिली आणि काही रेफरन्स असल्यास शेअर करण्याची विनंती केली.
24 मे ते आज 4 जून या अवघ्या 12 दिवसात मला क्लब चे चेअरपर्सन अजित पवार सर , ट्रेजरर सचिन शिरसाठ सर , दीपक करांडे सर, गोविंद काळे सर, मनयोगसिंग माखिजा सर यांनी दिलेल्या रेफरन्स मुळे *57,75,000/- किमतीचे 5 फ्लॅट्स बुक झाले ( 2,88,75,000/- दोन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख पंचाहत्तर हजार) चे Done डील क्लब च्या माध्यमातून मिळाले*
आज अखेरीस या प्रोजेक्ट मधील सर्वच्या सर्व 16 फ्लॅट बुक होऊन अहमदनगरमधील सर्वात वेगाने विक्री झालेला एकमेव प्रोजेक्ट बनला आहे
Sarurday club च्या सहकार्यामुळेच मला आज हे यश प्राप्त झाले आहे.
*क्लब मुळेच मला माझ्या व्यवसायासाठी ब्रँड ambassador बनवता आले आणि त्याच ब्रँड ambassador मुळे इतक्या कमी वेळात पुर्ण प्रोजेक्ट विकण्यात मला यश मिळाले*
*एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत..!!*
*Thank You SCGT*
Shilpa Sarda
Nagar Chapter
The information given is as shared by the member(s).