SCGT & Mentoring success story

August 23, 2024

वाह ताज !*

*SCGT & Mentoring success story*

मी मागच्या आठ वर्षापासून SCGT जळगाव चॅप्टरची मेंबर आहे. क्लबतर्फे नेहमीच वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. यातलेच दोन महत्त्वाचे  म्हणजे Mentoring आणि MDP sessions. 

मी 2020 मध्ये मेंटेरिंग सेशन पूर्ण केलं. त्यावेळी श्री. विनीत बनसोडे सर यांनी एक संकल्पना मांडली होती.. – *आपली स्वप्न मोठी ठेवा आणि त्याच अनुषंगाने कमीत कमी एकदा तरी “ताज” मध्ये जाऊन कॉफी प्या. तसंच तुम्ही तिथे कितीही वेळ बसू शकता आणि त्याचा उपयोग Business planning साठी करायचा!* याचाच अर्थ आपले ध्येय मोठे ठेवा आणि ते प्राप्त करण्यासाठी त्या अनुषंगाने मेहनत सुद्धा करा… विनीत सरांचं हे वाक्य मनात घोळत होतं. मनात स्वप्न होतंच की एकदा तरी आपण TAJ ला जायला हवं. त्याप्रमाणे, एकदा असंच नाशिकमध्ये असताना तिथल्या *TAJ ग्रुपच्या गेटवे हॉटेलला* गेले. तिथला ambience, आदरातिथ्य याबद्दल ऐकून होतेच आणि त्या प्रकारचा अनुभवही आला.

त्यावेळी एक गोष्ट मनात आली, की ताज ग्रुप आपला क्लायंट होऊ शकतो का? असे झाले तर किती छान होईल…दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती हे आमचं अत्यंत अनोख्या प्रकारचा ट्रेनिंग बऱ्याच कॉर्पोरेट मध्ये आवडतंय… मग विचार केला, हेच ट्रेनिंग आपण TAJ च्या सहकाऱ्यांसाठी घ्यावं. त्याच दिवशी तिथल्या HR विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांना संकल्पना समजावून सांगितली आणि आम्ही यापूर्वी विविध कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांमध्ये घेतलेल्या ट्रेनिंग बद्दलही सांगितलं. मीटिंग नंतर त्यांना प्रपोजलही पाठवलं. 

त्याप्रमाणे 10 एप्रिल 2024 रोजी *द गेटवे हॉटेल च्या leadership team साठी दुर्ग संस्कृतीतून कार्यसंस्कृती ही कार्यशाळा आम्ही घेतली*…. कार्यशाळेनंतर आम्हाला खूप छान प्रतिक्रिया मिळाल्या..

तसेच या ट्रेनिंगच्या फीडबॅकमुळेच ताज ग्रुपच्याच पुण्यातील सुप्रसिद्ध *BLUE DIAMOND (TAJ SELEQTIONS) आणि GINGER* च्या लीडरशिप टीम साठी सुद्धा या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

दुर्ग संस्कृतीच्या निमित्ताने अनेक नामांकित संस्था आणि कंपन्यांमध्ये ट्रेनिंग घेण्याची संधी मिळाली. यात आता *द गेटवे नाशिक, ब्ल्यू डायमंड पुणे, आणि जिंजर पुणे या नामांकित हॉटेल्सचा समावेश झाला. आमच्यासाठी ही मोठी स्वप्नपूर्तीच आहे.* 

या निमित्ताने मी *क्लबचे अध्यक्ष मा. श्री. दुगाडे साहेब, Trustees, Board of Directors, श्री. विनीत बनसोडे सर, अनिल कार्था सर, आणि मेंटॅरिंगची शी संबंधित सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.*

*Mentoring and MDP has made this possible.*

*SCGT फक्त आपल्याला स्वप्न आणि मोठे targets बघायला सांगत नाही तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्तमरीत्या मार्गदर्शन सुद्धा करतं…*

*एकमेका सहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत!*

रश्मी गोखले

‘गती’ज दुर्ग संस्कृती

जळगाव चॅप्टर

9881153936

The information given is as shared by the member(s).

Leave a Comment

3 × 4 =