श्री. सुनिल कणसे- दादर चॅप्टर

September 11, 2024

यशोगाथा

नमस्कार. मी सुनील कणसे- शील्ड इंडिया पेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे.
ऑगस्ट २०१७ पासून मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचा सभासद आहे. ऑगस्ट २०२४ ला मला सॅटर्डे क्लबमध्ये ७
वर्षे पूर्ण झाली. या सात वर्षांच्या कालावधीत मला अनेक उद्योजक मित्र मिळाले. सॅटर्डे क्लब मुळे उद्योजकतेत
आवश्यक असणारी मानसिकता टिकवून ठेवता आली आणि त्यातूनच अनेक यशोगाथा माझ्या व्यवसायासाठी
तयार झाल्या, त्या अनुक्रमे खालीलप्रमाणे :

यशोगाथा १ : अंधेरी पार्ले चाप्टरचे श्री. महादेव ठाकूर यांचा हाऊस किपींगचा व्यवसाय आहे, त्यांच्याबरोबर
व्यवसाय सुरु झाला तोही करोनाच्या काळात. त्यांनी शील्ड इंडियाची सॅनिटायझर्स सर्व्हिसेस ची शिफारस
त्यांच्या एका नामांकित बँकर कस्टमरला केली आणि करोना काळात जवळजवळ ५० लाखांची व्यावसायिक
उलाढाल झाली. श्री. महादेव ठाकूर यांचे आभार.

यशोगाथा २ : बोरिवली चाप्टरचे श्री. तेजस पाध्ये यांनी त्यांच्या ओळखीतून महाराष्ट्र् प्रदूषण नियंत्रण मंडळ,
मुंबई या सरकारी संस्थेचे पेस्ट कंट्रोल चे काम शील्ड इंडियाला २०२० साली मिळाले ते आजतागायत सुरळीत चालू
आहे. यातून शील्ड इंडियाला आज पयंत साधारण १५ लाखांचा व्यवसाय मिळाला आणि तो पुढे चालू राहणार आहे.
श्री. तेजस पाध्ये यांचे आभार.

यशोगाथा ३: वर्तमान मालाड चाप्टर चे मेंबर श्री. अरुण पाटील २०१८ ला दादर चॅप्टर चे मेम्बर होते. त्यावेळी
त्यांनी मला त्यांच्या काही क्लायंट्सना वैयक्तिक भेटवले होते. त्या भेटीतुन पुढील ४ ते ५ महिन्यात मला प्लॅटिनम
हॉस्पिटल, वसई चे वार्षिक साधारण २५ हजारांचे काम मिळाले.

सन २०२० ते २०२४: शील्ड इंडियाची प्रोफेशनल पेस्ट कंट्रोल सर्व्हिस अनुभवल्यानंतर प्लॅटिनम हॉस्पिटलच्या
ऍडमीन ने शील्ड इंडियाला सन २०२० मध्ये अपेक्स मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलला कनेक्ट केले. २०१९ ला
त्यांनी त्यांच्या बोरिवली पश्चिम हॉस्पिटलचे काम शील्ड इंडियाला दिले, आणि आज सांगायायला अभिमान वाटतो की,
अपेक्स मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलची मुंबईतील सर्व म्हणजेच एकूण पाच हॉस्पिटलला आपण पेस्ट
कंट्रोल सर्व्हिस देत आहोत. यांची वार्षिक व्यवसाय उलाढाल साधारण २.२५ लाख एवढी आहे.

सन २०२३ : पुढे २०२३ मध्ये अपेक्स हॉस्पिटलच्या ऍडमीन ने मुंबईतील नामांकित भाटिया हॉस्पिटल, ग्रॅन्टरोड
येथे कनेक्ट केले आणि भाटिया हॉस्पिटल शील्ड इंडियाच्या क्लायंट यादी मध्ये सामील झाला . ज्याची वार्षिक
उलाढाल साधारण ७.५ लाख आहे.

सन २०२४: पुढे २०२४ मध्ये भाटिया हॉस्पिटलच्या ऍडमीन ने शांतीलाल संघवी आय इन्स्टिटयूट, वडाळा येथे
कनेक्ट केले आणि ऑगस्ट २०२४ पासून शील्ड इंडियाने या मुंबईतील नामांकित आय इन्स्टिटयूटला सर्विस देणे
चालू केले आहे, ज्याची वानर्षणक उलाढाल साधारण ७.५ लाख असणार आहे.

श्री.अरुण पाटील यांनी २०१८ ला प्लॅटिनम हॉस्पिटलला कनेक्ट केला नसता तर आज २०२४ ला अपेक्स हॉस्पिटल,
भाटिया हॉस्पिटल आणि शांतीलाल संघवी आय इन्स्टिटयूट शील्ड इंडिया चे क्लायंट नसते म्हणून श्री. अरुण
पाटील यांचे विशेष आभार.

तर मित्रहो, या आहेत माझ्या सात वर्षांतील प्रमुख यशोगाथा, या व्यतिरिक्त अनेक छोट्या-छोट्या यशोगाथा आहेत ,
सॅटर्डे क्लबमध्ये गेल्या सात वर्षात दादर चाप्टर मध्ये प्रत्येक मिटींग मध्ये माझी डन डील असते, अशी एकही मिटींग
नाही जेथे मी डन डील जाहीर केली नाही. याचे संपूर्ण श्रेय मी माझ्या शील्ड इंडियाच्या टीमला आणि
सॅटर्डे क्लबच्या सभासदांना देतो, जे माझ्यासाठी त्यांच्या कस्टमर कडे शब्द टाकतात आणि सोबत उत्कृष्ट सर्व्हिस
बद्दल कस्टमरला हमी देतात. त्यामुळे माझे पुढील काम सोपे होते. सॅटर्डे क्लब ने माझ्यातील व्यावसायिक घडवला आणि त्यासाठी मी सॅटर्डे क्लबचा सदैव ऋणी आहे. धन्यवाद !
एकमेका साहय करु, अवघे होऊ श्रीमंत!!

श्री. सुनिल कणसे- दादर चॅप्टर
डायरेक्टर
शील्ड इंडिया पेस्ट सोल्युशन्स प्रा. ली.
मोबाईल – ८४५१०४७०७३

The information given is as shared by the member(s).

1 Comment

  1. Arun patil

    September 15, 2024

    Sunil it’s ur efforts I just done my responsibility and duty to connect you. As we believe in connects as connect is unlimited done deals
    .Best of luck

Leave a Comment

4 × five =